भजनी मालिका

भजने

वाट पाहें हरी कां नये आझूनि । निष्ठुर कां मनीं धरियेलें ॥१॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥ धन्यधन्य हरीचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वांटा घेई लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥१॥ ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वांटुनियां गडी चेंडु मांडियेली फळी । मेलासी धांवतां कान्हो नाटोपेचि बळी ॥१॥ येईल चेंडू हातारे । हरिसी शरण जातां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥ म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥ बाळ – तरुण दशा आपुलेच अंगीं । आपणची भोगी वृद्धपण ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥ निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाढी कवळ श्रीहरी हातें । आड वैष्णवातें करुनियां ॥१॥ म्हणोनियां अभिमान सांडा । घ्या हो तोंडा भरुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाढो लागे हरि नंदाचे मंदिरीं । नाना क्रीडा करी नित्य नवी ॥१॥ देखोनियां चोज भुलल्या नरनारी । देहभावें वरी वोंवाळिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव