भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी

vasanenche vasan samul phadi | trigun janavenk tayavari todi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥ यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें विचरतु जाई ॥२॥ मन दंडिजे तोचि घेई सुंदंडु । जीवनेंविण कमंडलु अखंडु ॥३॥ एकाक्षरजप करी । क्षराक्षरातीत धरणा धरी ॥४॥ स्वानंदाचें करी करपात्र । सहजीं सहज जेवीं नारायण वक्त्र ॥५॥ एका जनार्दनीं सहज संन्यासु । सहजीं सहज तेथें न लगे आयासु ॥६॥