भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें

vasanechya mukhin adaluni bhiten | nirvahapuraten karan ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥ सर्वकाळ हाचि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥ तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥३॥