भजनी मालिका

भजने

विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥ आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विचारूनि पाहा पंढरिचें पाडें । सुख होय थोडें क्षी-रसिंधू ॥१॥ सांडूनि वैकुंठ आले जगजेठी । वस्ती वाळवंटीं केली जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट । ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें ॥१॥ मी तूं हे मात हरपले दृष्टांत । ह्रदयीं ह्रदयस्थ निजतेजें ॥ध्रु०॥

विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥ गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धी करुनी ठेवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विटि दांडू भला रे तरीच मारीं टोला । नाहीं तरि डाव घेतां धांवडिती मुला ॥१॥ सावधान पाहे रे हरीचि चित्तीं ध्याये । न राहोनि निदसुरा खेळाच्या प्रवाहें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥ नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥ खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥ सुं म्हणोनियां मारिती टोला । हांसती त्याला डाव घेतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही वाह्या ॥१॥ गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळी भेटे वेळोवेळां केशिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥ श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥

रचनाकार: संत सेना

विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव ॥१॥ तें रूप पाहतां मन माझें वेधले । नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥२॥

रचनाकार: संत सेना

विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥१॥ कटीं पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ