भजनी मालिका

भजने

वायांची सोस संसार कामाचा । रामनामीं वाचा रंगी कां रे ॥१॥ यापरती जीवा सोडवण नाहीं । वेदशास्त्रीं पाहीं भाष्य असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायांविण करुं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ॥१॥ आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वारकरी संत पंढरीसी जाती । सप्रेमें नामघोषें ॥१॥ लोटांगणी त्यांसी जाईन आवडी । ओवांळीन कुडी वरुनी पायां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वारंवार काय विनवावें आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥१॥ तूं काय म्हणसी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उठोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥ न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा॥१॥ गेला मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥ हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वारंवार हाचि न पडावा विसर । बसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥ इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ । विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥ धाकुटिया मुलां घेतो हा चिमोरे । काय करुं धुरे भीत असों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव