भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें

vasanecha tyag karare sarvatha | ya bhaven ananta sharan javen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥ कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥ भक्ताचा पाळक अनाथाचा कैवारी । ब्रिदें चराचरीं वर्णि-ताती ॥३॥ शरीरसंपत्तीचा सोडा अभिमान । मन करा लीन कृष्ण-रूपीं ॥४॥ आसनीं शयनीं चिंतितां गोविंदु । तेणें तुटे कंदु भव-व्याधि ॥५॥ परदारा परदासांचे पीडन । सांडूनि भजन करा त्याचें ॥६॥ करा सर्वभावें संतांची संगति । नाहीं अर्थाअर्थीं जन्मा येणें ॥७॥ शुकसनकादिक प्रल्हाद जनक । परीक्षिती मुख्य बिभिषण ॥८॥ भीष्म रुक्मांगद नारद उद्धव । शिबि कवि देव इत्यादिक ॥९॥ शास्त्रांचें हें सार वेदां गव्हार । नाम परिकर कलियुगीं ॥१०॥ नामा म्हणे नको साधन आणिक । दिल्ही मज भाक पुंडलिकें ॥११॥