भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी

vasanechi bedi dehabudhdi vankadi

रचनाकार: संत रामदास · अभंग
वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी। वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला। संचित खायाला पुण्य नाही भक्ति पांघरूण तें माझें सांडलें । मज ओसंडिलें संतजनीं रामदास म्हणे ऐसियाचें जिणें। सदा दैन्यवाणें रामेविण।