भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें

valo jan maj mhanot shindali | pari ha vanamali na visamben

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥ सांडूनि लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे झाले तुका हरीरत ॥३॥