भजनी मालिका

भजने

कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥१॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥ आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥ कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥ तुझा म्हणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥ पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कां हो मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें चित्त तुझें ॥१॥ करुणाकल्लोळणी अमृत संजीवनी । चिंतल्या निर्वाणीं पावें वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां हो वाढवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोड्याचें ॥१॥ ठेविन पायांवरी डोईं । यासी तुमचें वेचे काईं । झालों उतराईं । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला ॥१॥ वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥ आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आतां ॥१॥ मागें बहुतापरी रक्षियलें आह्मां । अगा पुरुषोत्तमा दीनबंधु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥ जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं । तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें ॥१॥ लोकांपुढें सांगे आम्ही हरिभक्त । न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध ॥१॥ कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ