भजनी मालिका
← भजनांकडे परत

काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली

kag bag ritha marile balapanin | avaghi daityakhani budavili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥ गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥ वधुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥ पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले॥४॥ तुका म्हणे हा भक्तंचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥