भजनी मालिका
← भजनांकडे परत

काखे पान अंगणीं उभें उगें । भोजन मागें रामनाम

kakhe pan anganin ubhen ugen | bhojan magen ramanam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काखे पान अंगणीं उभें उगें । भोजन मागें रामनाम ॥१॥ आणिक नाहीं मज चाड । रामनाम गोड जेऊं घाला ॥२॥ आनरस सेवितां मंद पडिलों । तुझेंचि नामेंम रुचीस आलों ॥३॥ इच्छाभोजनीं तूं एक दाता । नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥