भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें

kanchanik bhakti sarvakal kari | bahutanche vairi hit nenen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें ॥१॥ लोकांपुढें सांगे आम्ही हरिभक्त । न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥ असंतोषी सदां अतितासी जाळी । सुक्रुताची होळी स्वयें केली ॥३॥ वेदमर्यादा सांडूनि चालती । हुंबतें घेती वार्‍यासवें ॥४॥ नामा ह्मणे आतां असो याचि मात । सुख नेणें हित कदा काळीं ॥५॥