भजनी मालिका
← भजनांकडे परत

काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध

kacharat pahatan kadu ten shend | paripakin pahatan godachi shuddha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध ॥१॥ कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥ साखरेचें वृंदावन केलें । चाखो नेणें तें नाडोनि गेलें ॥३॥ एका जनार्दनीं प्रपंचु एकु । नश्वर म्हणतां नाडला लोकु ॥४॥