भजनी मालिका

भजने

कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥ चुकी झाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस निर्धारीं छळिताती ॥१॥ आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदोदित मना छळिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥ कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्‌वैरी तत्पर हेचि येथें ॥१॥ क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण । षडऊर्मी पूर्ण देहीं हेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप ॥१॥ नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । झाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या ॥१॥ देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरी मेळीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं झालों देवा ॥१॥ आवरीतां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज ॥१॥ देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे ॥१॥ कल्पतरु वृक्ष असे ज्याचे घरीं । तो कां दारोदारीं भीक मागे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव