भजनी मालिका
← भजनांकडे परत

कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें

kagadichen vitta veshyesi didhalen | taisen amhan kelen narayanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥ जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं । तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥ कडू भोपळयाचा कोणता उपयोग । तैसें पांडुरंगें केलें जाण ॥३॥ नामा म्हणे ऐसें करूं नको देवा । समागम व्हावा पायांसवें ॥४॥