भजनी मालिका
← भजनांकडे परत

काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आतां

kakulati yeti sakalik lok | pahasi kautuk kay atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आतां ॥१॥ मागें बहुतापरी रक्षियलें आह्मां । अगा पुरुषोत्तमा दीनबंधु ॥२॥ कोण तुजविण आह्मांसि रक्षिता । उदारा अनंता जगजेठी ॥३॥ शरण शरण अगा वासुदेवा । अच्युता माधवा नारा-यणा ॥४॥ विलंब केलिया जातील रे प्राण । धरिती चरण नामा ह्मणे ॥५॥