भजनी मालिका

भजने

कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥ पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें झालें काई । एका तें का नेणसी ॥१॥ केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥१॥ काय गणिकेच्या याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें ॥१॥ भक्तीप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥ मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे नागविसी काळा । मानिसी संसार सोहळा । शेवटीं तो गळां । यमपाश पडतील ॥१॥ वाचे म्हणे रामनाम । आणीक नको दुजें काम । मोक्ष मुक्ति धाम । नामें एका जोडती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥ बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया ॥१॥ वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गातां होय दुःख रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कां रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी करसी वायां ॥१॥ हें तों पोसणें आणिलें उसणें । जयाचें तया देणें अनायासें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥ कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति खुंटे चि ना ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥ कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां रें हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा ॥१॥ नाम श्रीरामांचे नित्य घेई वाचे । तुटलें जन्माचें दुःख जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ