भजनी मालिका

भजने

कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाहीं ॥१॥ पूर्वपुण्यबळें लाधलें तयासी । देतां उपमेसी उणा शक्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ । शेरा कैंचे फळ अमृताचें ॥१॥ कण्हेरीच्या मूळा सुगंध तो नाहीं । कसाबाची गाई जिणें कैचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांडील्या कुटल्या होतो मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काढिली हळदुली लखलखीत सोज्वळी । जन्म ब्रह्मचळी झालें तिये ॥१॥ अति सूक्ष्म सुरंग शोभिवंत अंग । ज्यासी होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काढी काढी भ्राती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज ॥१॥ सर्वभावें शरण विठठलासी जाई । ठायीचाचि ठायीं निवारिल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्षं तिचा ॥१॥ असे कांहीं इच्छा मागावें आणीक । दिल्हें हें बाळक ह्मणती दोघे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांतीपुरीमाजीं राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठीं ॥१॥ सहनशील दया मूर्तिमंत अंगी । न भंगे प्रसंगी सत्वधीर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें बरवा । रुपें विठ्ठल हृदयीं ध्यावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कानावाटें मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा नयन मी जाहलों ॥१॥ दृष्टीद्वारां मी पाहे सृष्टीं । सृष्टी हरपली माझें पोटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम