भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा

kan ho deva kanhin na bola chi goshti | kan maj himputi karitasa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥ कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥