भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां होती कां होती । देवा एवढी फजीती

kan hoti kan hoti | deva evadhi phajiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥१॥ मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥ होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां खंती रे ॥२॥ तुका म्हणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥३॥