भजनी मालिका

भजने

कां करिसी हव्यास इंद्रियांचा सोस । वायां कासावीत कोण्या काजें ॥१॥ सर्व ही लटिकें मोहबंधन । सत्य हें निधान विठठल एक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां गा केशिराजा मोकलीलें मातें । शरण मी कोणातें जाऊं आतां ॥१॥ तुजविण मज न दिसे निर्वाणीं । मायबाप धणी गणगोत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥ तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कां गा मोकलिलें माझिया विठ्ठला । धांवा तुझा केला मायबापा ॥१॥ त्रितापें तापलों बहुत पोळलों । चिखलीं पडिलों दीनानाथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥ दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥ पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां जी कृपावंत झालेति निष्ठूर । नाईका उत्तर करुणेचें ॥१॥ काय अजामेळा होती पुण्यरासी । नेला वैकुंठासी नामोच्चारें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायीच्या ठायीं ॥१॥ कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम