भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें

kan ho panduranga na kara dhanvanen | tari maj konen sodavaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥ तुझा म्हणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥ काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥२॥ नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥३॥ तुका म्हणे चाले आणिकांची सत्ता । तुज आठवितां नवल हें ॥४॥