भजनी मालिका

भजने

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला ॥१॥ रुप सांवळे शोभें विटेवरी । तो हरी डोळेभरी देखियेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं ॥१॥ जोडियेली जोडी हुंडारि दुरी । नावडें पंढरी तया जना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥ कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करा रे बापानों साधन हरीचें । झणीं करणीचें करुं नका ॥१॥ जेणें नये जन्म यमाची यातन ऐसिया साधना करा कांही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करा हरिभक्ती संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रो जाग्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन यमाचें ॥१॥ रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव ॥ध्रुव॥

रचनाकार: संत एकनाथ