भजनी मालिका

भजने

कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥ कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा हें भूषण जनामध्ये सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥ नीचिये कुळींचा उंच वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥ टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथाश्रवणें उपजे विरक्ति । कथाश्रवणें वाढे शांति । कथाश्रवणें परमानंद प्रप्ति । कथा श्रवणें ॥१॥ पापी उध्दरती । कथा श्रवणें उपाधी तुटे । कथाश्रवणें भवाब्धि आटे । कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे । समुळ तुटे मायाजाळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कथाश्रवणें विरक्ति जोडे । निजशांती वाढे उल्हासें ॥१॥ कथाश्रवणें परमानंद । प्रगटे स्वानंद निज ह्रदयीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥ येथे तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥ पुण्य घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेई सेवटीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥ कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ॥ मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । कीं मजला सांगा बा० ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका ॥१॥ मर्कटाचीये परे नाचे घरोघरीं । नाचवोनि भरी पोट तैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम