भजनी मालिका
← भजनांकडे परत

करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा

kara narayana | majhya duhkhachi khandana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥ वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥ तुका म्हणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥