भजनी मालिका
← भजनांकडे परत

कया सांगों हृषीकेशी । आहे अनुताप आला ऐसा

kaya sangon hrushikeshi | ahe anutap ala aisa

कया सांगों हृषीकेशी । आहे अनुताप आला ऐसा । गिळायासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥ माझें बुडविलें घर । लेकरें बाळें दारोदार । लाविली काहार । तारातीर करोनी ॥२॥ जीव घ्यावा किंवा द्यावा । तुझा आपुला केशवा । इतकें उरलें आहे देवा । भावाचिया निमित्यें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे जग । बरें बाईट म्हणों मग या । कारणें परि लाग । न सांडावा सर्वथा ॥४॥