भजनी मालिका
← भजनांकडे परत

करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा

kara kara lagapat | dhara pandharichi vat | janv nahin chapet | ghat padila kalacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥ होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातेवाहेटाळीं । जव मोकळी आहेती ॥२॥ कां रे घेतलासी सोस । तुज वाटताहे कैसें। तुका म्हणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥३॥