भजनी मालिका

भजने

करितां उसी हातां नये चेंडु गमाविला । धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥ म्हणती म्हणे कीर । नाहींतरी घेंई फेर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करितां तें युद्ध नव दिवस झालें । संकट पडलें पांडवांसी ॥१॥ एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करितां देवपूजा। नित्य नेम सारिला वोजा। मग आठविलें अधोक्षजा। ध्यानस्थ बैसलों ॥१॥ दूत आले लवलाही। राये बोलाविलें पाहीं। कोठें आहे मज दावी । उरी न ठेवी याची कांहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना

करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थे ॥१॥ शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥ मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साठी जीवें भावें नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन ॥१॥ करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं ॥१॥ नाम वाचे आठवितां । साधनें सर्वा येती हातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ