भजनी मालिका

भजने

करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊं पाहें ॥१॥ द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरी वरी । बीज अग्नीमाझारीं । विरुढें कैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करितां होय होय चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥ मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितांचि सीमा उल्लंगन । म्हणती अक्रूरा ऐकें वचन । तुवां जावें रथ घेऊन । सांगावें वर्तमान रायासी ॥१॥ तेणें आज्ञा वंदुनी शिरीं । चालिला पुढें वेगें करी । बळराम कृष्ण गोवळ भारी । आले बळिया रजकापें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करिताम हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां ॥१॥ बहुत व्युत्पत्ति सांगति पुराण । व्यर्थ तें स्मरण नाम नव्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथें ॥१॥ शंख नामा तेथें आलासे गुह्यक । नाहीं त्या विवेक पापि-यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एक एकां॥१॥ गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥ माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥ देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥ तैसें झालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करी कांहीं मनाएका विचरणा । संतांच्या चरणा न विसंबे ॥१॥ तयाचा मी दास कामारी दुर्बळ । तेंचि माझे सकळ हित करती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ