भजनी मालिका

भजने

कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥ लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण ॥१॥ तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचें मन निर्मळत्व ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥ मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा करुनियां दावी प्रेमकाळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥ तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिका धरी बोंडी नासिकाची ॥धृ॥ टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥१॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥ ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा । अखंड स्मरा रामनाम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥ जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥ ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कथा पुराण ऐकतां । झोंपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥ ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जे चित्ती । कांहीं नेघे आपुल्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम