भजनी मालिका
← भजनांकडे परत

करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे

karavili taisi keli katakat | vankaden kin nit dev jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥ कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥ तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥