भजनी मालिका
← भजनांकडे परत

करा माझा अंगिकार । पतीतपावन थोर ब्रीदा

kara majha angikar | patitapavan thor brida

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करा माझा अंगिकार । पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥ उपेक्षितां हांसती लोक । म्हणती सेवक जड झाले ॥२॥ मग ते तुम्हां होईल लाज । अंतरेल काज पुढील ही ॥३॥ निळा म्हणे अपकीर्ती अंगा । न ये पांडुरंगा करावें तें ॥४॥