भजनी मालिका

भजने

कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काहीं न चले ॥१॥ आणूनियां तृण बीज तें भक्षिती । निर्वाह या रीति चालविती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची ॥१॥ तयाचिया मुखा श्वानाची ते विष्ठा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कपटनाटका कल्लोळ करुणा । मजलागीं दीन होसी देवा ॥१॥ रात्रंदिवस मज ठेवुनि जवळ । घालसी कवळ मुखामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कपटें पयपानसी । मोहें मोहनराशी । विषयी विष स्तनासी ।देवों आली ॥१॥ तंव तो सावध निजमुखीं । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटीं । तेंचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी ॥१॥ सहलाचिया खेळा गे जोडि घननीळा । नलगे कांही घेणें देणें परि हा तो जवळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥ आवडीचें चिन्ह सांगवेना वाचे । जाणावें जयांचें त्यांचें त्यांनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥ जग डरे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदसाहि पैठा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कबीराचे घरीं आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक ॥१॥ उठोनी कबीर संतां नमन केलें । बैसावया दिलें तृणासन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो ॥१॥ मनमृग आमुचा वेधोनि गेला । पाहातांचि डोळा श्रीकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कमळगर्भा मनीं थोर चिंता करी । पद्म ठसेवरी उम-टताती ॥१॥ नीलोत्पल जैसें चरण वानूं कैसे । सकुमार राजस विठ्ठ-लाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें ॥१॥ आनंदु वो परमानंदु ध्यातां । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ