भजनी मालिका
← भजनांकडे परत

करचरण प्रक्षाळुनी उभी ठेली वृंदावनीं

karacharan prakshaluni ubhi theli vrundavanin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
करचरण प्रक्षाळुनी उभी ठेली वृंदावनीं ।। १ ।। जोडोनियां करकमळ म्हणे धांवरे गोपाळ ॥२॥ कृष्णा पाहतोसी काय । सत्त्वहानि होत आहे ॥३॥ ऋषि स्नानासी कोपिष्ट गेले सांगोनियां स्पष्ट । । ४ । । दिवसा कर्माचा उगाणा सर्व सारोनियां जाणा।।५।। आतां येतो शीघ्र गती अत्रे वाढा पात्रावरुती ॥६॥ अन्न न देखतां डोळां । भस्म करीन सकळां ॥७॥ गेला घालोनि संकटीं लाज राखें जगजेठी।।८।। कोणी नाहीं रे निर्वाणीं म्हणे नामयाची जनी ॥ ९॥