भजनी मालिका
← भजनांकडे परत

करा हरिभक्ती संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रो जाग्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन यमाचें

kara haribhakti santanchen pujan | vrat ekadashi ratro jagran | vasudev namachen mukhin uchcharan | tenen na hoy bandhan yamachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करा हरिभक्ती संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रो जाग्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन यमाचें ॥१॥ रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव ॥ध्रुव॥ नित्य वाचे नामावळी । वदे वदे सर्व काळीं । पातकांची होळी । क्षणमात्रें होईल ॥२॥ जनांसी तारक वासुदेव नाम । आणीक नको साधन वायांचि नेम । गावें तूं सुखें जनीं जनार्दन । एकाभावें वंदी एका जनार्दन ॥३॥