भजनी मालिका
← भजनांकडे परत

करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती

karavitan vrat ardhe punya labhe | modavitan doghe naraka jati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥ आपुलें देऊनी आपुला चि घात । शन करावा थीत जाणोनियां ॥२॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडूं नये ॥४॥