भजनी मालिका
← भजनांकडे परत

करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं

karanten kapal nam naye vache | sadaiv daivachen prem namin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं ॥१॥ जोडियेली जोडी हुंडारि दुरी । नावडें पंढरी तया जना ॥२॥ आपण नवजे दुजिया जावों नेदी । ऐसा तो कुबुद्धि नागवितो ॥३॥ नामा ह्मणे नाम गर्जे वारकरी । वैकुंठ पंढरी देशोदेशीं ॥४॥