भजनी मालिका

भजने

आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥ घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां सुखा नाहींचि उणें । सेवागुणें स्वामीचियां ॥१॥ अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्‍त्रीं गुण त्याचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं ॥१॥ देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥ सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें ॥१॥ रडतसों आम्हीं मारितसों हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचें गाऊं ॥१॥ दुजे नेणों स्वप्नीं विठठलवांचुनीं । जनीं मनीं निरंजनीं देखा हेंचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं ॥१॥ सर्वभावे त्याचें करितां सेवन । आमुचें हितकल्याण जन्मोजन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥ विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ