भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं

amhansi to ek santanche | dujen anuman nenon kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं ॥१॥ सर्वभावे त्याचें करितां सेवन । आमुचें हितकल्याण जन्मोजन्मीं ॥२॥ एका जनार्दनीं संतांचे चरणीं । जाईन लोटांगणीं जीवेभावें ॥३॥