भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते

amhan hen kavatuk jaga dyavi nit | karave phajit chukati te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥ अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥ तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोटया परी ॥३॥