भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम

amhan sarvabhaven hen chi kam | na visambhaven tujhen nam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥ आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥२॥ तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥