भजनी मालिका

भजने

आम्हीं न मागों ऐसा कधीं । कृपानिधी वर दयाल ॥१॥ आपुल्या पायीं वसवा चित्त । माझें अखंडित दुजें न मार्गो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही नरका जातां काय येईल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥ तुज शरण आलियाचें काय हें चि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें ॥१॥ मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । उभे महाव्दारीं ठाकोनिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं । नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥ मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही पाहा कैसीं एकतत्त्व झालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥ तुम्हांविण कांहीं नावडावें या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥ जालें तुम्हां मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे जाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान ॥१॥ आम्हां सोवळें वोवळें नाहीं । विटाळ न देखों कवणें ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ