भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों

amhampashin yachen bal | kon kalavari ton

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥ करूनि ठेलों जीवेंसाठी । होय भेटी तोंवरी ॥ध्रु.॥ लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥ तुका म्हणे अवकाश । तुमच्या ऐसें व्हावया ॥३॥