भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां सोइरे हरीजन । जनीं भाग्य निकींचन

amhan soire harijan | janin bhagya nikinchan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां सोइरे हरीजन । जनीं भाग्य निकींचन ॥१॥ ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥ भुक तहान चित्तीं। सदा देव आठविती ॥२॥ तुका म्हणे धन । ज्याचें वित्त नारायण ॥३॥