भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या

amhansi ton nahin anik praman | namasi karan vithobachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु.॥ अबद्ध वांकडें जैशातैशा परी । वाचे हरी हरी उच्चारावें ॥२॥ तुका म्हणे आम्हां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥३॥