भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां सापडलें वर्म । हरिभक्तिचें सुगम

amhan sapadalen varma | haribhaktichen sugam

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्हां सापडलें वर्म । हरिभक्तिचें सुगम ॥१॥ त्यांचे आळवावें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥२॥ वाजउनी टाळी । सुखें नाचावें राउळीं ॥३॥ निळा म्हणे संतीं । दाविलें हें कृपावंतीं ॥४॥