भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म

amhan sampadlen varma | karun bhagavatadharma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥ अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥ अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥ संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥ नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥