भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां हेंचि थोर सद्‌गुरुविचार

amhan henchi thor sad‌guruvichar

आम्हां हेंचि थोर सद्‌गुरुविचार । नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥ नेघों ते काबाड न करूं विषम । ब्रह्मांड हें होम आम्हां राम ॥ २ ॥ नेदूं यासि दुःख उन्मनीचें सुख । न करूं हा शोक आला गेला ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे आम्हां सद्‍गुरु उपदेश । सर्व भूतीं वास हरि असे ॥ ४ ॥