भजनी मालिका

भजने

वैकुंठवासिनी कृपावंत माउली। जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥ शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई। ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना

वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नाश करणे बहु॥१॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती ॥१॥ तारिलें वानर वनचरे रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ ॥१॥ वैकुंठ कोपत जुनाट झोंपटी । नको अडा अडी घालूं आह्मां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैकुंठाहूनि केलें पेणें । भक्त प्रर्‍हादाकारणें ॥१॥ नर-हरि पावला पावला । महापापा पळ सूटला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैकुंठीं माहें तंव चतुर्भुज दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥१॥ क्षीरसागरीं पाहें तों तेथें निद्रिस्त । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥ धारीष्ट धैर्याचा वरीष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैकुंठीचा राणा येउनी लवलाहो । सुकुमारा पाहे अवलोकुनी ॥१॥ धांवूनियां देव गळां घाली मिठी । आलिंगला पोटीं सदगदित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥ धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥ बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमें ॥१॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तवत्ते समर्पिलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगीं त्याचा ॥१॥ आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचें चरण चुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैजंयती माळ किरीट कुंडलें । रुप तें सांवळें विटेवरी ॥१॥ वेधलें वो मन तयांच्या चरणीं । होताती पारणीं डोळीयांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ