भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठीचा राणा येउनी लवलाहो । सुकुमारा पाहे अवलोकुनी

vaikunthicha rana yeuni lavalaho | sukumara pahe avalokuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैकुंठीचा राणा येउनी लवलाहो । सुकुमारा पाहे अवलोकुनी ॥१॥ धांवूनियां देव गळां घाली मिठी । आलिंगला पोटीं सदगदित ॥२॥ म्हणे बाळा काय इच्छा पोटीं आहे । माग लवलाहे पुरवीन ॥३॥ एका जनार्दनीं नुठवी दुजी आई । ऐसें कांही देई मजलागीं ॥४॥